बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 20 मार्च 2018 (17:11 IST)

मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर मुंबईची जीवन वाहिनी लोकल पुर्वव्रत

अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी तब्बल साडेतीन तास मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर आपला रेल रोको मागे घेतला आहे. अॅप्रेंटिसच्या उमेदवारांना प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी  आंदोलन मागे घेतलं आहे. आज दिवस सुरु होताच सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून सुरु असलेलं आंदोलन साडेतीन तासांनी मागे घेण्यात आल आहे. रेल्वेकडून अॅप्रेंटिसच्या उमेदवारांना दोन ते तीन दिवसात  चर्चा करत असल्याचे आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर आंदोलक ट्रॅकवरुन हटले आहेत. त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात येत आहे. सुरुवातील लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या, त्यापाठोपाठ लोकलही रवाना झाल्या आहे. सरकार आमच्यावर अन्याय करत आहेत. मोदी सरकारने रोजी रोटी चे आश्वासन दिले नोकरीचे दिले मात्र ते पूर्ण करत नाही त्यामुळे आम्ही संतापलो आहोते. हे सरकार खोटे बोलते असे विद्यार्थी म्हणत आहेत. तर विविध राजकीय पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. अॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनाची रेल्वेकडून दखल, अॅप्रेंटिस उमेदवारांची वेगळी परीक्षा घेणार, या परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डचा निर्णय घेतला आहे.
 
परीक्षा भरतीतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला सरकारने ज्या पद्धतीने हाताळलं त्याचा आम्ही निषेध नोंदवत आहोत. हे आंदोलन होणार आहे याची पूर्वकल्पना असताना देखील रेल्वे अधिकारी विद्यार्थ्यांना येऊन का भेटले नाहीत? या विद्यार्थ्यांची ‘मन की बात’ समजून घ्यायची रेल्वे मंत्रालयाची इच्छा नाही का? २ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याच्या घोषणा केल्यात पण २ लाख रोजगार पण सरकार निर्माण करू शकलं नाही आणि म्हणून हा रोष बाहेर आला आहे. 
निष्क्रिय सरकारचा आणि रेल्वे मंत्रालयाचा मनसे निषेध 
अविनाश अभ्यंकर 
नेता प्रवक्ता 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 
 
हे सरकारचं अपयश, अतिशय दुर्दैवी, निंदनीय घटना, एकही अधिकारी अजूनही आंदोलकांपर्यंत कसा पोहोचला नाही? अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न संसदेत उपस्थित करणार : सुप्रिया सुळे