गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2023 (13:37 IST)

Mumbai:वांद्रे वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली, शोध मोहीम सुरु

bandra varsova sea link to be named on savarkar
सोमवारी मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याचे वृत्त आहे. माहितीनंतर मुंबई पोलीस, नौदल आणि तटरक्षक दल त्या व्यक्तीचा शोध घेत असून शोध मोहीम राबवत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने आपली कार वांद्रे वरळी सी लिंकच्या मध्यभागी थांबवली आणि नंतर पुलावरून अरबी समुद्रात उडी मारली. या घटनेनंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात येत आहे. वांद्रे वरळी सी लिंक हा पाच किलोमीटर लांबीचा पूल आहे जो वांद्रे ते वरळीला जोडतो. हा आठ पदरी पूल दक्षिण मुंबईत आहे. 
आज सकाळी ही घटना घडली आहे. या व्यक्तीने असा निर्णय का घेतला अद्याप कळू शकले नाही. पोलीस आणि नौदलाकडून या व्यक्तीचा शोध सुरु आहे. 
 


Edited by - Priya Dixit