मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2023 (07:57 IST)

मुंबई : मोडक सागरही ‘ओव्हर फ्लो’

modak sagar talav
मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस (Mumbai Rain) पडत आहे. त्यामुळे सात तलावांपैकी तुळशी, विहार व तानसा हे तीन तलाव अवघ्या 20 ते 26 जुलै दरम्यान भरून वाहू लागले आहेत. ही बाब मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली. असे असताना गुरुवारी  रात्री 10.52 मिनिटांनी मोडक सागर तलावही भरून वाहू लागल्यामुळे मुंबईकरांच्या आनंदात आणखीन एका तलावाची भर पडली. आता सात पैकी चार तलाव भरून वाहू लागले आहे.
 
मुंबईला दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या सात तलावांत मिळून 9 लाख 85 हजार 130 दशलक्ष लिटर (68.06 टक्के) पाणीसाठा जमा झाला असून त्याचे गणित केल्यास हा पाणीसाठा पुढील 255 दिवस म्हणजेच 7 एप्रिल 2024 पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर 1 जुलैपासून लादण्यात आलेली 10 टक्के पाणीकपात लवकरच रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor