मुंबईत स्थितीत आमची चूक नाही - महापौर
मुंबईत जो पाऊस झाला तो नैसर्गिक होता. आम्ही सर्व एकत्र आलो होतो आणि काम करत होतो. जे झाले ते निसर्गिक होते, यात आमची चूक नाही असे मुंबईचे महापौर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दावा केला आहे. तर मी आमचे प्रशासन पूर्णवेळ काम करत होतो यात मी माफी का मागावी असा उलटा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
काही तासात ३०० मिली पेक्षा पाऊस झाला आणि आपले नाले हे अरुंद आहेत. तर त्यावेळी भरती सुद्धा आली त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी साचले होते, ही जबादारी सार्वजनिक आहे सर्वांची आहे अश्या उलट्या गोष्टी महापौर बोलत होते. आढवा बैठीनंतर त्यांनी माध्यमांसोबत आपले मत व्यक्त केले होते. आम्ही कोणतीही जबादारी झटकत नाहीत मात्र आम्ही माफी का म्हणून मागावी असेही त्यांनी म्हटले आहे.