शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (12:37 IST)

मुंबई हादरली ! माथेफिरूने 5 जणांवर धारदार चाकूने हल्ला केला ,दोघांचा मृत्यू

crime
मुंबईतील ग्रँटरोड इमारतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. या इमारतीत एका माथेफिरूने पाच जणांवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना मोबाईलच्या केमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

सदर घटना ग्रँटरोड परिसरात राहणाऱ्या एका माथेफिरू व्यक्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर धारदार चाकूने हल्ला केला. चेतन गाला असे या माथेफिरू व्यक्तीचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चेतनेचे आपल्या पत्नीसोबत वाद सुरु होते. शेजारचे काही जणं पत्नीला भडकवतात आणि मग ती आपल्याशी वाद घालते असे चेतनला वाटायचं त्याचे नेहमी शेजाऱ्यांशी वाद होत होते. शुक्रवारी रागाच्या भरात येऊन भर दुपारी इमारतीच्या गॅलरीत त्याने शेजारच्यांवर सपासप धारदार चाकूने वार केले. या त्याने 5 जणांवर हल्ला केला या मध्ये दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना इमारतीच्या खाली उभा असलेल्या  एका नागरिकाने केले आहे. घटनेच्या वेळी नागरिकांनी आरडाओरड केली. पण चेतनने कोणालाही जुमानले नाही आणि चाकूने सपासप वार केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी चेतनला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 

Edited By- Priya Dixit