शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (17:36 IST)

नाशिकमध्ये परदेशातून इतक्या नागरिकांचे आगमन; नाशिक महापालिका हाय अलर्टवर!

नाशिक (प्रतिनिधी): दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रोन या व्हेरीयंटमुळे (Omicron Variant) संपूर्ण जग हादरले असून भारतातही विशेष खबरदारी घेतली जात आहे.
युरोपियन देशांमध्ये लॉकडाउन होत असताना भारतात मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याची बाब समोर आली आहे.रविवारपासून परदेशातून आलेल्या नागरिकांची आकडेमोड संकलित केली जात असताना मंगळवारी (ता. ३०) शहरात तब्बल २२ परदेशी पाहुणे आल्याचे समोर आले आहे.
गंगापूर रोड, सिडको आदी भागात वास्तव्याला असून, त्यांची स्वॅब तपासणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा नवा कोरोनाचा विषाणू आढळून आला आहे. या विषाणूचे ३० म्युटेशन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.
त्यामुळे जगभरात ओमिक्रॉनबाबत सतर्कता बाळगली जात आहे. नाशिकबत विचार करायचे झाल्यास परदेशातून येत असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २६ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत आयर्नमॅन स्पर्धेसाठी गेलेल्या दोन व त्यांच्या कुटुंबासह वाहनचालक, असे पाच जण परतले.
त्यामुळे शहरात ओमिक्रॉनची दहशत निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. परदेशातून आलेल्या नागरिकांवर प्रशासनाची बारीक नजर असून, अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. काही थेट भारतात न येता दुबईमार्गे येत आहे. फ्रान्सवरून एक नागरिक दुबईमार्गे भारतात व पुढे नाशिकमध्ये आला. ओमिक्रॉनमुळे जिल्हाधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाला सूचना दिल्यानंतर त्या व्यक्तीचा शोध घेऊन स्वॅब घेण्यात आले. त्या व्यक्तीचा रिपोर्टदेखील निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.