शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (11:31 IST)

उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Uddhav Thackeray discharged from hospital
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर ते विश्रांतीसाठी वर्षा या त्यांच्या सरकारी बंगल्यावर दाखल झाले आहेत.
 
उद्धव ठाकरे 10 नोव्हेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आलीय.
 
ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.
 
डॉ. अजित देसाई हे ह्रदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.
 
रिलायन्स उद्योगसमुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
 
"आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे." असंही उद्धव ठाकरे दाखल होताना म्हणाले होते.
 
तत्पूर्वी, सोमवारी (8 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमधील पालखी मार्गातील चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. त्यावेळीही त्यांनी मानेला पट्टा लावला होता.