शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (09:28 IST)

आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार असल्याची माहिती जाधव यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 
 
चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
 
चंद्रकांत जाधव यांचा अल्प परिचय
यशस्वी उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांची महाराष्ट्रभर ओळख
2019 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले, काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत जाधव यांच्याकडून पराभव
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही जाधव यांचे होते घनिष्ठ संबंध
चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून होत्या कार्यरत
शांत मितभाषी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी ओळख त्यांनी निर्माण केली