testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उपराजधानीत युवकाचा हात पाय बांधून खून नागपूर हादरले

murder
Last Modified शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (15:18 IST)
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. डोबी नगर येथे हा खून झाला आहे. या थरारक हत्येमुळे परिसरात खळबळ उडली असून नागरिक भयभीत झाले आहेत. मृतकाची ओळख पटली नसून हत्येच कारणही अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या हत्येचा अधिक तपास करत आहेत.
ही हत्या काल (8 ऑगस्ट) रात्री झाली आहे असे पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. यातील भयानक गोष्ट म्हणजे मृत युवकाचे हात पाय बांधून गळा कापण्यात आला आहे. या धक्कादायक हत्येमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. हत्या कुणी केली? का केली? याचा शोध अजनी पोलीस घेत आहेत.

मागील काही दिवस नागपूरमधील गुन्ह्यांत भयानक वाढ होत आहे. मागील महिन्यात नागपूरमध्ये एका मॉडलची निर्घुण हत्या करण्यात आली होती. ही हत्या तिच्या प्रियकराने केली असल्याचे समोर आलं होतं. प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरुन प्रियकराने तिचा खून केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने या हत्या आणि इतर बेकायदा कामे रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आवाहन आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

#SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड

#SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड
राष्ट्रवादीचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला ...

हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठींबा

हर्षवर्धन जाधव यांना एमआयएमचा पाठींबा
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी शिव स्वराज्य पक्षाचे प्रमुख ...

मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन : नारायण राणे

मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन : नारायण राणे
निवडणूक होऊन जाऊ दे त्यानंतर मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा नारायण ...

अजित पवाराकडून ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट

अजित पवाराकडून ‘चंपा’ या शब्दाबद्दल मोठा गौप्यस्फोट
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप ...

न्या. शरद बोबडे यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस

न्या. शरद बोबडे यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. प्रथेनुसार गोगोई यांनी ...