सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (17:21 IST)

क्लासचालकाची केली गोळ्या घालून हत्या

पूर्ण राज्यात शिक्षण आणि लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूर येथे मोठी घटना घडली आहे. लातूरच्या ट्यूशन गल्लीतील स्टेप बाय स्टेप या क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा रात्री एकच्या सुमारास गोळ्या घालून खून केला. चव्हाण घराकडे चालले होते. वाटे दबा धरुन बसलेल्या मारेकर्‍यांनी तीन गोळ्या झाड्ल्या. एक त्यांच्या डाव्या छातीत तर दुसरी दंडात घुसल्याचे सांगण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करुन चव्हाण यांची कार ठाण्यात आणून झाकून ठेवली आहे. या घटनेची पार्श्वभूमी कदाचित वेगळी असावी त्यामुळेच सर्व पोलिसांना बोलाऊन बंदोबस्त तैनात केला जात आहे. सगळ्याच बाबी प्राथमिक स्वरुपाच्या असल्याने याबाबत पोलिसांनी बोलण्यस नकार दिला. अविनाश चव्हाण यांच्या स्टेप बाय स्टेप या क्लासेसच्या नांदेड शाखेचे उदघाटन होणार  होते.