मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (14:25 IST)

मला विधानपरिषदेची उमेदवारी... पंकजा मुंडेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

pankaja munde
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (3 मे ) आठवा स्मृतिदिन आहे. आजच्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येेत आहेत. याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडे  यांच्याकडून शुक्रवारी गोपीनाथ गडावरून विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून काय बोलणार, याची उत्सुकात सर्वांना लागली आहे. यापूर्वी पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 
 
मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे. हीच माझी शक्ती आहे. आता पक्ष याबाबत लवकरच निर्णय घेईल. घोडामैदान फार लांब नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मी संधीची अपेक्षा करत नाही, तो माझा स्वभाव नाही. राजकारणात संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे मिळेल त्यामधूनच संधी निर्माण करते. गोपीनाथ मुंडे यांनीही जे जे पद भुषवले, ते आपल्या कर्तृत्त्वाने मोठे करून दाखवले. त्यामुळे आमच्यावर 'चिंधीचं सोनं करावं', हे संस्कार झाले आहेत. त्यामुळे मी कोणत्याही संधीची वाट पाहत नाही. ती माझी प्रवृत्तीच नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.