रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (16:05 IST)

नागपुर: 2 दिवसांचा लॉकडाऊन घोषित, काय सुरू काय बंद जाणून घ्या

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी आणि डेल्टा प्लसचा वाढता धोका लक्षात घेता नागपुर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नागपुरात दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभुमिवर सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
 
राज्य सरकारच्या सूचनेनुसार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नवीन लॉकडाऊन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा‍अधिकार्यांूनी आदेश जारी करून लॉकडाऊन 12 जुलैपर्यंत वाढविला आहे. म्हणजे आता 12 जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 4 वाजता सगळे दुकाने बंद होतील. 
 
संध्याकाळी 4 नंतर हॉटेल, रेस्टॉरंट्सची पार्सल सुविधा देखील बंद केली गेली आहे. परंतु होम डिलिव्हरी सुरू राहील. शनिवार व रविवारी दुकाने व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व काही बंद राहील. 
 
राज्यात डेल्टा, डेल्टा प्लस या कोव्हिडच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याचा पार्श्वभूमिवर हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. 28 जून सकाळी 7 वाजतापासून लागू करण्यात आलेले नियम 5 जुलैला सकाळी 7 पर्यंत लागू आहेत. नवे नियम 5 जुलैला सकाळी 7 पासून 12 जुलै सकाळी 7 पर्यंत लागू राहणार आहेत.