1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 19 जून 2023 (13:28 IST)

Nagpur : 3 बेपत्ता मुलांचा मृतदेह कार मध्ये आढळले

social media
नागपुरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तीन मुले त्यांच्या घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर कारमध्ये मृतावस्थेत आढळून आली. या तिघांमध्ये दोन भाऊ बहीण होते. गाडीमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तौफीक फिरोज खान (4), आलिया फिरोज खान (6) आणि आफरीन इर्शाद खान (6) अशी मृतांची नावे आहेत, तिघेही फारूक नगरचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून तिन्ही मुले शनिवार दुपार पासून बेपत्ता झाले होते. कुटुंबियांना वाटले की मुले बागेत खेळायला गेली. संध्याकाळी देखील मुले घरी परतली नाही तर कुटुंबीयांनी पोलिसात माहिती दिली. अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर रविवारी संध्याकाळी7वाजेच्या सुमारास मुलांचा शोध घेता एका हवालदाराला त्यांच्या घराजवळ एक एसयूव्ही उभी असलेली दिसली आणि आतमध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळले.
 
तौफिक आणि आलिया हे दोघे भाऊ बहीण आहे तर आफरीन घराच्या जवळ राहते. पोलिसांनी सांगितले विशेष परवानगी मिळाल्यानंतर रात्री शवविच्छेदन केले जाईल, कारण त्याचा अहवाल आल्यावर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. 
 



Edited by - Priya Dixit