रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कॉंग्रेस इच्छुकांची हीन पातळी जिवंत नेत्यांचे तेरावे

महापालिका निवडणुकीत यावेळी अनेक नवीन गोष्टी पहायला मिळत आहेत. तर पक्षासी एक निष्ठ असलेले अनेक पक्षातील कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. मात्र नागपूर येथील कॉंग्रेस कार्यकर्ते इतक्या खालच्या पातळीला गेले की त्यांनी त्यांच्या नेत्यांचे जिवंतपणी तेरावे ठेवले असून त्याबाबत परिपत्रका छापले आहे. त्यामुळे आता कार्यकर्ता कसा राग व्यक्त करेल याचा काहीच नेम नाही असे दिसतय. 
 
यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि प्रदेश सरचिटणीस अभिजीत वंजारी यांचं 15 तारखेला राजकीय तेरावं आयोजित केल्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच निकालाच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला गोड जेवणाला या, असंही पत्रिकेत छापण्यात आलं आहे.हे पत्रक नागपूर मध्ये चर्चेचा विषय झाला असून कोणी छापली हे मात्र समजू शकले नाही.