1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (18:09 IST)

Nagpur : दोन वर्ष घरातच कैद असणाऱ्या चिमुकलीची सुटका, नागपुरातील घटना

Nagpur
Nagpur : मुलें म्हणजे देवाघरची फुलें असं म्हणतात. पण या फुलासोबत अमानवीय कृत्य केले जातात हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक 8 ते 10 वर्षाच्या चिमुकलीला घरात डांबून तिच्यावर पाश्र्विकअत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अथर्व नगरी 3 मध्ये एक दाम्पत्य घर भाड्याने घेऊन राहत होते. त्यांच्या घरात एक 8 ते 10 वर्षांची चिमुकली होती. हे दाम्पत्य तिच्या कडून घरातील सर्व काम करून घ्यायचे. तिला विनाकारण बेदम मारहाण करायचे एवढेच नाही तर तिच्या संपूर्ण अंगावर सिगारेटचे आणि तव्याचे चटके देण्याचा जखमा दिसल्या. 

गेल्या 4 -5 दिवसांपासून हे कुटुंबीय बाहेर गेल्याने त्यांनी या चिमुकलीला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं होतं. चिमुकलीने स्वतःची सुटका करून घराच्या खिडकीतून बाहेर पडली आणि शेजारच्यांना घडलेलं सर्व सांगितलं.

तिच्या सम्पूर्ण शरीरावर मारहाणीच्या आणि चटके देण्याच्या जखमा दिसून आल्या. चिमुकलीची अवस्था पाहून शेजाऱ्यांच्या मन हळहळलं त्यांनी तातडीनं चाईल्ड लाईन केअर संस्थेत या प्रकरणाची माहिती दिली आणि तक्रार नोंदवली. तसेच पोलिसांत त्या कुटुंबियांच्या विरोधात त्यांना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून या मुलीचा आणि त्या कुटुंबीयांचा काय संबंध आहे हे अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. 
 
 
 



Edited by - Priya Dixit