1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (15:34 IST)

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी माफी मागावी, पटोले यांची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर घणाघात केला आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक वर्षे दिशा दाखवली आहे.
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लोकसभेत आणि राज्यसभेत झाले. खर तर पंतप्रधान हे देशाचे असतात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान ज्या पद्धतीने कऱण्यात आला. राजकीय व्यवस्थेमध्ये देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेले व्यक्ती स्वतःला अजूनही भाजपचे प्रचारक म्हणून वागत असतील तर त्या पदाची गरीमा संपवणं हे भाजपला वाटत असेल तर ठीक आहे, असे नाना पटोले म्हणाले.
 
पण हा महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपने जाहीर माफी मागितली पाहिजे. पंतप्रधानांनीसुद्धा माफी मागितली पाहिजे, ज्या महाराष्ट्राने देशाला खूप काही दिले आहे. ज्या महाराष्ट्राने प्रत्येक राज्याला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. गुजरातमध्ये भूकंप आला तर त्यासाठी सर्वात जास्त मदत या महाराष्ट्राने केली आहे. ज्या मुंबईने धीरुबाई अंबानी, गौतम अदानी असतील यांना श्रीमंत करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. अभिनेते होण्यासाठी आलेल्या लोकांना मोठं करण्याचे काम ज्या महाराष्ट्राने केले त्या महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम झालं आहे. त्याला खऱ्या अर्थाने निषेध करु तेवढा कमी होईल असेही नाना पटोले म्हणाले आहेत