मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (20:23 IST)

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी  राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आला होता.  
 
सध्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे आहेत. त्यांनी काही  दिवसांपूर्वी प्रदेश अध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते. नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी त्यांनीच मागणी केली होती.