मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (15:36 IST)

शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय : आशिष शेलार

शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. अमिबाला सुद्धा लाज वाटावी, अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा शिवसेना पक्ष आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते  बोलत होते. 
 
महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप करत शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे, याचा अर्थ यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. भाजपने मागणी लावून धरल्यानंतर अटक करण्यासाठी कारवाई केली जात आहे. मूळात परिषदेला परवानगीच का दिली?, अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली. 
 
शरजील उस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जाऊ का दिले? शरजीलला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केले आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.