1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (17:11 IST)

मला शिवसेनेकडून ऑफर, राणेंनी केला खुलासा

narayan rane

सिंधुदुर्गात झालेल्या सभेनंतर नारायण राणेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला शिवसेनेकडून ऑफर असल्याचा खुलासा केला आहे. मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला त्यांच्या नेत्यांशी थेट बोलणी करण्यास सांगितलंही होतं.पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दात  सांगितलं की, मला शिवसेनेत यायचं नाही असं राणे म्हणाले . यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक पक्षात माझ्यासाठी जागा असल्याचं म्हटलं. सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन केलं नाही तर तो लोकांचा, कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्तपणा होता असंही म्हणाले.