शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (14:05 IST)

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'दे धक्का' अंदोलन

शिरुर कासार येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल गॅसच्या वाढत्या भावाच्या विरोधात मोटारसायकल ढकलून आणि सायकल चालवून अंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. संभाजी चौक ते जिजामाता चौक रॅली काढण्यात आली. तसेच पेट्रोल डिझेलचे भाव तात्काळ कमी करण्यात यावेत या मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महेबूब शेख, तालुका अध्यक्ष विश्वास नागरगोजे, जिल्हाउपाध्यक्ष संतोष जरांगे, युवक तालुका अध्यक्ष गोकुळ सवासे, सुनिल यादव, अमोल चव्हाण, शहराध्यक्ष खदीर भाई, युवक शहराध्यक्ष विनोद पवार, अर्जुन गाडेकर, रमा नाना कातखडे, शांतीशेठ, संतोष गुजर, चाॅंद शेख, बबन चौधरी, अनिल बडे, सावता कातखडे, पोपट खामकर, सुभाष यमपुरे इत्यादी पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.