बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (22:20 IST)

नारायण राणे यांनी सुपारी घेतली आहे का ते सांगावे

kishori pednekar
केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी आज २२ सप्टेंबर थेट पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर खरपूस शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांच्याकडे वाकड्या नजरेने बघाल, तर जागेवर ठेवणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर आता ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणेंना लक्ष्य केलंय. त्या मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होत्या.
 
शिंदे गट आणि भाजपाकडे वाकड्या नजरेने बघू नका असे नारायण राणे म्हणाले आहेत. त्याला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी सुपारी घेतली आहे का ते सांगावे. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही एका गुंडाने सुपारी घेतल्याप्रमाणे बोलत आहात. प्रत्येक पक्षाचा पक्षप्रमुख आपल्या पक्षासमोर मांडणी करत असतो. त्यांना एवढी मिरची लागण्याची काय गरज? एक केंद्रीय मंत्री सुपारी घेतल्यासारखे बोलत असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.