1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2023 (07:55 IST)

नाशिक: कत्तलीसाठी नेणाऱ्या 41 गायींची सुटका

Wadala Naka in Nashik
जुने नाशिक नाशिक मधील वडाळा नाका परिसरात असलेल्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून 41 गाईंची सुटका केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1ने केली आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भद्रकाली परिसरातील वडाळा नाका येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखान्यामध्ये सुमारे 41 गायींचे कत्तल होणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना मिळाली होती.
 
त्यांनी उपनिरीक्षक उगले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक ठाकूर, उपनिरीक्षक मुंढे यांच्यासह जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला व तीन खोल्यांमध्ये लपवून ठेवलेल्या 41 गायींची सुटका केली.
 
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये वडाळा गाव येथे राहणारे फिरोज अब्दुल कुरेशी व चौक मंडई येथील वसीम अत्तार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास पोलीस हेल्पलाईन नंबर 112 या नंबरवर नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील अमोल इंदरचंद शर्मा यांनी ‘वेहेळगाव शिवारात चोरटी रेती वाहतूक सुरु आहे. तुम्ही लवकर या असा कॉल केला. तातडीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रावण बोगीर, पोलीस वाहन चालक शाम थेटे, ज्ञानदेव जगधने असे तिघे जण नांदगाव पोलीस ठाणे इथून तात्काळ सरकारी वाहनाने वेहेळगाव इथे पोहोचले.

Edited  By - Ratnadeep Ranshoor