शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (18:36 IST)

नाशिक : शेतकरी महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून फेकले

murder
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात दहीदि गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेची हत्या करून तिच्या मृदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याची घटना घडली आहे.सुमनबाई भास्कर बिचकुले असे या मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दहिदी येथे शेतकरी महिला सुमन एकटीच शेतात काम करत असताना अज्ञाताने सुमनवर फावड्याने हल्ला केला. घटनेच्या वेळी सुमनचे पती बाजारात गेले होते. हल्लेखोराने सुमनच्या पायांचे तुकडे केले मृतदेह फरफटत जंगलात नेलं आणि सुमनच्या गळ्यावर आणि छातीवर वार करत धड पासून शीर विच्छेद करण्याचा प्रयत्न केला. नंतर हल्लेखोर पसार झाला. सुमनच्या पती घरी आल्यावर सुमन दिसली नाही बराच काळ झाल्यावर तिची शोधाशोध गावकरीच्या मदतीने घेण्यात आल्यावर तिचे मृतदेह जंगलात तुकडे केलेले मिळाले. घटनेची माहिती पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले असून प्रकरणाचा तपास सुरु केला असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नाशिकात खळबळ उडाली आहे. 
 
Edited By - Priya Dixit