शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (16:34 IST)

नाशिक :महिलेला काळ फासत चपलांचा हार घालत धिंड काढली

rape
नाशिकच्या चांदवड तालुक्यात शिवरे गावात एका विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासत गळ्यात चपलांचा हार घालून गावात धिंड काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

चांदवड तालुक्यातील शिवरे गावात एका महिलेचा अपघात होऊन हाताला फ्रॅक्चर झाले तिच्या पतीने तिला तिच्या माहेरी तिची काळजी चांगली घेतील असे म्हणत सोडले पती तिला आणि दोन्ही मुलांना भेटायला यायचा. पत्नी ला दहा दिवसापूर्वी तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची सूचना सासरच्या लोकांनी दिली. 

दशक्रियेला पत्नी मुलांना घेऊन आली आणि माझे पती आत्महत्या करणार नाही ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय तिने व्यक्त केला.त्यावर संतापून महिलेच्या नणंदेने तिला मारहाण करायला सुरुवात केली.गावातील  काही महिलांनी   देखील नणंदेला साथ देत विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासून तिच्या गळ्यात चपलांचा हार टाकत गावात धिंड काढली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतातच त्यांनी गावात जाऊन पीडित महिलेची सुटका करत वडनेर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  
 
Edited By - Priya Dixit