1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (18:22 IST)

Nashik : नवजात बाळाचा डॉक्टरच्या हातातून पडून दुर्देवी मृत्यू

A newborn baby died
Nashik : नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयात महिलेच्या प्रसूती दरम्यान डॉक्टरच्या हातातून निसटून एक नवजात बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

ही घटना महाराष्ट्राच्या नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयात घडली आहे. महिलेची प्रसूती होत असताना बाळ डॉक्टरांच्या हातातून निसटून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून डॉक्टरांनी बाळ आधीच  दगावल्याचे सांगितले. डॉक्टरांनी दिशाभूल करण्याचा करण्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद  केली असून  कुटुंबीयांनी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.      

नवजात बाळाचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल त्या नंतर कारवाई करण्यात येईल.  

Edited by - Priya Dixit