1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (08:08 IST)

नाशिक- अजित पवारांच्या दौऱ्यात चोरट्याने साधली संधी; माजी नगरसेवकाचे पाकीट लांबवले

ajit panwar
उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री अजित पवार यांचा नाशिकरोड दौरा मोठ्या उत्साहात झाला; मात्र एका चोरट्याने माजी नगरसेवकाचे पाकीट मारल्याने दौरा त्यांना मोठा महागात पडला.
 
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार व वित्तमंत्री पद मिळाल्या नंतर प्रथमच नाशिक ला “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी रेल्वेने आले. नाशिक व नाशिकरोड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत पायी चालत येऊन पुतळ्याचे पूजन केले. यावेळी मोठी गर्दी झाली होती, पोलीसही मुबलक प्रमाणत होते. मात्र चोरट्यांनी या गर्दीचा फायदा घेऊन नाशिकरोड मधील एका लोकप्रिय माजी नगरसेवकाचे पाकीट मारून पाकिटातील जवळपास तीस ते पस्तीस हजार चोरून नेले.
 
त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा या माजी नगरसेवकाला चांगलाच महागात पडला. आणखी किती लोकांना भुर्दंड पडला यांची माहिती मात्र मिळू शकली नाही.
 
Edited By - Ratnadeep ranshoor