शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (14:28 IST)

Nashik :नाशिकच्या जवानाचे अपघाती निधन

Shradhanjali RIP
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात धानोरे येथील रहिवासी भारतीय सैन्य दलातील श्रीराम गुर्जर (24) यांचे घरी सुट्टीवर आले असता अपघातात निधन झाले आहे. श्रीराम गुर्जर हे आसाम च्या गुवाहाटी येथे भारतीय सैन्य दलात  बॉम्बे इंजिनिअर कोर 236 IWT युनिट मध्ये गेल्या सात वर्षांपासून कर्तव्य बजावत होते. ते 25 दिवसांपूर्वी रजेवर आले होते. श्रीराम हे शिर्डी वरून देवदर्शन करून मोटारसायकलवर निघाले होते. त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या बाईकने धडक दिली. या अपघात दोन्ही दुचाकीवरील चालक जखमी झाले. तर श्रीराम यांच्या मागे बसलेला त्यांचा मावस भाऊ जागीच ठार झाला. 

अपघाताची माहिती मिळतातच पाथरेच्या ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या वर धानोर येथे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात आजोबां आई, वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे. 
 
Edited by - Priya Dixit