गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (08:27 IST)

नाशिक: लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

death
आई म्हटलं कोणत्याही संकटावर मात करुन आपल्यासाठी हाताचा पाळणा करत असते. आपल्या मुलांसाठी कोणताही धोका पत्करुन त्यांना वाढवत असते. मात्र अशात जर मुलगा आईला सोडून गेल्यास आईसारख दुःख कुणालाच होत नाही.
 
असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये घडला आहे. सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे-फत्तेपुर येथील सांगळे कुटुंबातील मुलाचे नवी मुंबई निधन झाल्याची वार्ता समजताच गावी असणाऱ्या आईला हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
निर्हाळे फत्तेपूर येथील रहिवासी शिवराम फकिरबा सांगळे हे सध्या नवी मुंबईत राहायला होते. सांगळे हे मुबंई येथील अधीक्षक शिक्षण निरीक्षक विभागातून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.
काही दिवसांपासून ते पॅरालिसिसच्या आजाराने त्रस्त असताना बुधवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. नातेवाईक त्यांचे शव मुंबईवरुन अंत्यविधीसाठी निऱ्हाळे येथे आणत असताना आई ठकुबाई यांच्या कानावर ही वार्ता गेली. त्यानंतर काही वेळातच हृदयविकाराचा झटका आल्याने आईनेही प्राण सोडले.
 
दरम्यान सकाळी सांगळे यांचे निधन झाल्यानंतर अंतिम विधीसाठी त्यांचे शव गावाकडे आणण्यात येत होते. यावेळी गावी भाऊ, भावजया आणि आई होते. मात्र मुलाच्या निधनाची वार्ता 95 वर्षीय आई ठकूबाईंना कळवली गेली नव्हती. मात्र, घराकडे येणारे नातेवाईक आणि काही उपस्थितांना रडू न आवरल्याने ही वार्ता ठकूबाई यांना समजल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला अन् त्यांचेही निधन झाले. त्यामुळे सांगळे कुटुंबीयांवर दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला आहे. मुलापाठोपाठ आईनेही जीव सोडल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor