शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2023 (07:42 IST)

नाशिक जिल्ह्यात एकाच वेळी ४६ अवैध दारू अड्ड्यांवर धाड

नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरात तब्बल ४६ ठिकाणी अवैध दारू बनवणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करत दहा लाख रुपयांची तयार दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त करून संबंधीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
 
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ग्रामीण ५०० अधिकारी व अंमलदारांनी नाशिक ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी गावठी दारूची अवैधपणे गाळप करणा-या एकूण ४६ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून सुमारे दहा लक्ष रुपयांची तयार दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त केली.
 
या धाडसत्रात जिल्ह्यातील कळवण मधील ११, वाडीवऱ्हेमधील ५, मालेगाव ४, सुरगाणा, घोटी, देवळा, सटाणा, जायखेडा व इगतपुरी मधील प्रत्येकी ३, निफाड व पेठमधील तालुका हद्दीतील प्रत्येकी २, सिन्नर, अभोणा, वणी व त्रंबकेश्वर मधील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे.
 
या कारवाई दरम्यान पोलीसांनी अवैध दारु गाळप करणा-या ठिकाणांसोबतच, रसायन बनवण्यासाठी लागणा-या गुळ विक्रेत्यांवरही कारवाई करून विशेषत: सटाणा तालुक्यातील ठेंगोडा व देवळा तालुक्यातील लोहणेर गावांतून मोठ्या प्रमाणावर काळा गुळ व नवसागर जप्त केले.


Edited By-Ratnadeep Ranshoor