1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (08:39 IST)

नाशिक :केकचे पैसे मागितल्याचा राग; बेकरी चालकावर धारदार शस्त्राने वार

crime
केकचे पैसे मागितल्याचा राग आल्याने सहा जणांच्या टोळीने बेकरीचालकासह कामगारास धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना सातपूर येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अनिकेत सुरेश जाधव यांची कार्बन नाका येथे अभिषेक बेकरी आहे. या बेकरीवर काल संशयित आरोपी शुभम् अरुण पवार (वय 21, रा. ध्रुवनगर, गंगापूर, नाशिक), हेमंत अरुण गाडेकर (वय 21, रा. शिवाजीनगर, सातपूर), मुकेश दिलीप कुंभार (वय 23, रा. श्रमिकनगर, सातपूर, मूळ रा. पाचोरा, जि. जळगाव), सागर सुरेश गायकवाड (वय 19, रा. शिवाजीनगर, सातपूर, मूळ रा. आराई, ता. बागलाण), नयन विठ्ठल गवई (वय 25, रा. श्रमिकनगर, सातपूर, मूळ रा. बुलढाणा) व पंकज ऊर्फ विकी कैलास श्रीसागर (वय 27, रा. सातपूर, मूळ रा. करंजवण, ता. दिंडोरी) हे सहा जण आले. फिर्यादी जाधव यांच्या दुकानातून केकची ऑर्डर देऊन केक घेऊन जात असताना बेकरीमालकांनी केकचे पैसे मागितले.
त्याचा राग आल्याने या सहा जणांनी दुकानमालकांना धाक दाखवून शिवीगाळ केली, तसेच दुकानातील कामगारांना धमकावले. त्यानंतर सहा जणांपैकी कोणी तरी धारदार हत्याराने दुकानमालकाच्या डोक्यात मारून दुखापत केली. त्यानंतर हे टोळके पळून गेले.
 
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सहा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor