गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (08:08 IST)

चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक सुरूच अहवालानंतरच बंदचा निर्णय

traffic
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणात अंतिम टप्प्यातील खोदकामासाठी आठडाभर घाट बंद ठेवण्याची परवानगी महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवली आहे. त्यानुसार प्रांत, पोलीस अणि परिवहन खात्याकडे मागवलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतरा घाट बंदचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, व्हायरल पत्रामुळे गोंधळ उडाला असला तरी सध्यस्थितीत घाटातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. घाटात काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने हा घाट वाहतूकीसाठी 27 मार्च ते 3 एप्रिल कालावधीत बंद ठेवून या कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गे वळवणेबाबत विनंती केली आहे.
 
दरम्यान, या प्रकरणी वस्तुस्थितीची पहाणी करुन अहवाल सादर करण्याचे पत्र अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना दिले होते. मात्र हे पत्र व्हायरल झाल्यानंतर गोंधळ उडाला. दरम्यान, सोमवारी घाटातील वाहतूक सुरळीत सुरू होती.

Edited By - Ratnadeep ranshoor