शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (08:16 IST)

आनंद महिंद्रांनी केलं नाशिकच्या अनुष्का पाटील यांचं कौतुक; असं आहे त्यांचं कर्तृत्व

anushaka
ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी नाशिकची महिला अनुष्का पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केले आहे. अनुष्का या सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या महिंद्राच्या प्रकल्पात कार्यरत आहेत. अनुष्का या इंजिनिअरींग विभागात एका मोठ्या विभागाचे नेतृत्व करतात.
 
खास बाब म्हणजे महिंद्राच्या XUV700 या कारच्या प्रकल्पातील तब्बल 700 पुरुषांची टीम त्या सांभाळतात. अनुष्का यांनी 12 वर्षांपूर्वी नाशिकच्या महिंद्रा प्रकल्पात नोकरी सुरू केली. त्यावेळी त्या पहिल्या आणि एकमेव महिला अधिकारी नाशिकच्या प्रकल्पात होत्या.  उत्कृष्ट कर्तव्य बजावत असल्यामुळे कंपनीने त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या वेळोवेळी दिल्या. आणि आता त्या एका विभागाच्या प्रमुख आहेत. आनंद महिंद्रा यांनी अनुष्का यांच्याबद्दल म्हटले आहे की, त्यांची कथा ही एक उदयोन्मुख कथा आहे. स्त्री-पुरुष समानता साध्य करण्यासाठी आम्हाला मोठा पल्ला गाठायचा आहे. आम्ही यात वेगाने पुढे गेलो नाही तर अनेक प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व आम्ही गमावू. अनुष्का ही त्यापैकीच एक आहे. दर सोमवारी आनंद महिंद्रा हे सकारात्मक आणि उदयोन्मुख व्यक्तिमत्वांची ओळख करुन देतात. त्यात आज त्यांनी अनुष्का यांची निवड केली आहे.दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या कौतुकामुळे अनुष्का यांचे कार्य संपूर्ण जगभरातच पोहचले आहे.