शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (21:28 IST)

नाशिक जिल्हा उपनिबंधक सतिष खरेला ३० लाखाची लाच घेतांना पकडले

Bribe
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील लाखाे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासह आवश्यक परवानग्या आणि निवडणुका लावणाऱ्या जिल्हा उपनिबंधक सतिष भाऊसाहेब खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. खरे यांच्या काॅलेजराेडवरील 'आई' या निवासस्थानी ही कारवाई केली आहे. 
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर आणि वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी आणि निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा वकील सभद्रा यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. संबंधित लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे आणि त्यांच्या साथीदाराला लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. 
 
सोमवारी रात्री उशिरा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. खासगी सावकारीविराेधी प्रलंबित अर्ज, रेंगाळलेली दस्तनोंदणी यासह अनेक कामे प्रलंबित ठेवत 'मध्यस्थी'च्या मार्फत आर्थिक व्यवहार असणाऱ्या उपनिबंधक कार्यालयातील गैरव्यवहार यातून उघड झाला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor