पॉर्न बघणाऱ्यांनी कौटुंबिक कार्यक्रमच पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये-पृथ्वीक प्रताप
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून नावारुपाला आलेला कलाकार पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याने नुकतंच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांची संवाद साधला. चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी त्याने दिली. यावेळी एका चाहत्याने महाराष्ट्राची हास्यजत्रावरुन केलेली कमेंट पाहून पृथ्वीकला राग अनावर झाला.
“महाराष्ट्राची हास्यजत्रा आता कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही. कुटुंबाबरोबर बसून हा कार्यक्रम मी बघत असेल आणि एखाद्या जोकवर हसलो तर तिथेच विषय संपतो”. असं एका चाहत्याने पृथ्विकला म्हटलं. पण त्या प्रेक्षकाचं हे म्हणणं पृथ्विकला अजिबात पटलं नाही. त्याने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये त्याला उत्तर दिलं.
काय म्हणाला पृथ्वीक प्रताप?
पृथ्वीक म्हणाला, “Incognito मोडमध्ये जाऊन पॉर्न बघणाऱ्यांनी कौटुंबिक कार्यक्रमच पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये. दिवसाला आई-बहिणींवरुन शंभर शिव्या देणाऱ्यालाही वेगळ्या अर्थाचा एखादा पंच आला की, त्रास होतो. वाह रे दुनिया”. पृथ्वीकने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये योग्य ते उत्तर दिलं आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor