शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मे 2023 (08:24 IST)

नाशिक: तर भरा तब्बल दोन हजार रुपयांचे पेट्रोल

petrol diesel
नाशिक: भारतीय रिझर्व बँकेने तीन दिवसांपूर्वी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामान्य नागरिकांसह देशातील प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच पेट्रोल पंप चालकांना आतापर्यंत दोन हजार रुपयांचे सुट्टे देण्यास अडचण नव्हती. मात्र या निर्णयानंतर पेट्रोल पंप चालक पुरते वैतागले आहेत. त्यामुळे आता पेट्रोल भरण्यासाठी दोन हजारांची नोट घेऊन येत असाल तर थेट दोन हजार रुपयांचे इंधन घ्यावेच लागेल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
 
भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच दोन हजार रुपयांची न चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. शिवाय फक्त एका अर्जाद्वारे हे काम होणार आहे. मात्र या सर्वांचा सारासार विचार केला तर आताच्या घडीला सामान्य नागरिकांकडे दोन हजार रुपयांची नोट गेले अनेक महिने दिसेनाशी झाली आहे.
 
त्यामुळे व्यापारी वर्ग उद्योजक, पेट्रोलपंप धारक इत्यादींना नोटांना व्यवहारात आणून किंवा बँकेत जमा कारवाई लागणार आहे. मात्र अशातच पेट्रोल पंप चालकांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. पन्नास-शंभर रुपयांचे इंधन घेण्यासाठी थेट दोन हजार रुपयांची नोट दिली जात असल्याने पंपचालक दोन दिवसातच त्रस्त झाले आहेत. किमान दोन हजार रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल घेतले तरच ही नोट स्वीकारण्यात येईल, अशी भूमिका नाशिकमधील नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेलफेअर असोसिएशनने घेतली आहे.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून मूळातच दोन हजार रुपयांची नोट चलनात अल्प प्रमाणात आहे. त्या तुलनेत पाचशे रुपयांची नोटच अधिक चालते. त्यामुळे सामान्य नागरिकांकडे अगदी खूप प्रमाणात दोन हजार रुपयांची नोट आहे, अशातला भाग नाही. मात्र, अल्प प्रमाणात असल्या तरी त्या बदलता येतील, आता असलेल्या नोटा बदलण्यासाठी नागरिकदेखील प्रयत्न करत आहेत.

Edited By- Ratnadeep Ranshoor