शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (10:36 IST)

नाशिक – शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र सुरुच; वेगवेगळ्या भागात तीन घटना

suicide
शहर व परिसरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या तिघांनी रविवारी गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी उपनगर,पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या तिन्ही आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. देवळाली गावातील पंकज अशोक कदम (३४ रा.धनगर गल्ली) यांनी रविवारी आपल्या राहत्या घरातील पंख्यास अज्ञात कारणातून नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक लखन करीत आहे. दुसरी घटना हिरावाडी रोड भागात घडली. सचिन बाळू आहेर (३० रा.त्रिमुर्तीनगर) यांनी रविवारी आपल्या राहत्या घरातील किचनमधील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मयुर जाधव (रा.बोरगड) यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत. तर पवन झेवीअर लकडा (२२ रा.पंचरत्न प्राईड,खालचे चुंचाळे,अंबड) या युवकाने रविवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ऐरिक कुजूर यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूी नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.