गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा
राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला झालेल्या भाषणानंतर पुण्यात मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीदवरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसेने हनुमान चालीसा लावला. पुण्यातील माजिद अमीन शेख वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष असून त्यांनी राजीनामा दिला आहे.
मागील काही दिवसापासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे. मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या पत्रात दिली आहे. माजिद शेख यांच्यानंतरर अनेक मनसे मुस्लिम कार्यकर्ते राजनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे
मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही. या मशिदी आणि मदरशांमध्येच घातपाती कारवाया करणारे दडले आहेत. याविषयी माहिती मिळाली तर तुम्हाला धडकी भरेल, असे राज ठाकरे म्हणाले.