रविवार, 6 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (17:56 IST)

राष्ट्रवादीचं मिशन 2024 तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा

मागील काही दिवसापासून राज्यात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय अंतर्गत कणकण दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीदरम्यान अडचणीच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त प्रसारित झालं होतं.
 
महाविकास आघाडीमध्ये असे काही विविध मुद्यावर धुसफूस सुरु असताना एकीकडे शिवसेनेचे काही नेते आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार असल्याची स्पष्टोक्ती देत आहेत. कालच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त याबाबत भाष्य केलं होतं. तसेच मराठा आरक्षण आणि अन्य प्रलंबित मागण्या घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये पर्सनल बैठक झाली. याच मुद्यावरून महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्ष एकत्र येणार का? अशा चर्चा घडू लागल्या. दरम्यान, मोदी-ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी आमचं नातं संपलं नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून महविकास आघाडी मध्ये चर्चेला उधाण आलं.