रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (18:08 IST)

कोणाला किती निधी याचा अजितपवारांनी वाचला पाढा

ajit pawar
भाजप ने बहुमत चाचणी विश्वास दर्शक ठराव जिंकला तर ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडी कडून 99 मते मिळालीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेत आमदारांनी त्यांचा अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन पर भाषण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जोरदार भाषण केलं यावेळी मात्र अजित पवार यांनी शिंदे यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच टोमणे मारले आहेत.
 
अजित पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान आहेत ते मुख्यमंत्री पण झाले .उपमुख्यमंत्री पण झाले ,विरोधी पक्षनेते झाले ,सगळी महत्त्वाची पद त्यांनी भूषवली. मागच्या टर्ममध्ये शिंदे यांना फक्त रस्ते विकास महामंडळ का दिलं असा सवाल करत जर एकनाथ शिंदे सर्व गुण संपन्न होते तर छोटासा रस्ते विकास महामंडळ याचा जनतेशी संबंध नव्हता हायवे करायचे टनल करायचे असे असताना त्यांना दुसर कुठल खात का नाही दिलं? याचा महाराष्ट्र पण विचार करेल असा टोला अजित पवार यांनी लगावला. 40 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते 106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यामंत्री होत नाही यांच्यात निश्चित काही काळ गोर असेल असं देखील अजित पवार म्हणाले.105 मुळे तुम्ही मुख्यमंत्री आहेत हे बोलायला मनुष्यस्वभाव मागे पुढे पाहणार नाही.
 
कोणाला किती निधी वाचला पाढा
त्याच बरोबर अजित पवारांनी कुठल्या खात्याला किती निधी दिला याचा देखील पाढा वाचला पहिल्या वर्षी 3 हजार 61 कोटी रुपये दिलं दुसऱ्या वर्षी 2 हजार 177 कोटी दिले 21 – 22 ला 4 हजार 52 कोटी दिले 2645 कोटी दिलेत एकनाथ शिंदेंना मतदार संघात 366 कोटींचा निधी संदिपान भूमरे यांना 167 कोटी उदय सामंत 221 कोटी दादा भुसे 306 कोटी गुलाबराव पाटील 309 कोटी शंभूराज देसाई 294 कोटी अब्दुल सत्तार 206 कोटी अनिल बाबर 186 कोटी महेश शिंदे 170 कोटी शहाजी पाटील 151 कोटी महेंद्र थोरवे कोटी दिलेत असा पाढा यावेळी अजित पवारांनी सभागृहात वाचला.
 
कारण नसताना राष्ट्रवादीला बदनाम करू नका
अजित पवारांनी विशेष अधिवेशनात बोलतांना बंडखोर आमदारांनी हि टोमणे मारलेत म्हणाले कि बजेटवर किंवा इतर बाबींवर मुख्यमंत्रीच हात फिरवतात . मग असं सांगण्यात आलं की राष्ट्रवादीमुळे अन्याय राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थविभाग असताना , फक्त तुम्हीच नाही तर काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनीही याप्रकारचे आरोप झाले , तुम्हाला अनैसर्गिक आघाडी झाली, अमुक झालं , तमुक झालं, पण कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका