शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2019 (18:25 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे दीर्घ आजाराने निधन

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या  विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तर मुंबईतील सैफी रुग्णालयात त्याच्या वर  उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. डोळस यांच्या पार्थिवावर माळशिरस तालुक्यातील दसुर या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  डोळस माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रहिवाशी होते. तर ते  2009 पासून माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्या तेव्हा पासून,  मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. हनुमंतराव डोळस हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार होते.पहिल्यांदा 2009 मध्ये विधानसभेवर निवडून गेले, 2014 मध्येही राष्ट्रवादीकडूनच आमदार होते. शरद पवारांनी यामुळे त्यांचा दुष्काळी दौर रद्द केला आहे.