शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कबुतराला पकडण्याचा मोह जिवावर बेतला

उल्हासनगरमध्ये खिडकीच्या कोपऱ्यात बसलेल्या कबुतराला पकडण्याचा मोह एका तरुणाच्या जिवावर बेतला आहे.  
 
सागर सोनवणे (20) असे या तरुणाचे नाव असून कबुतर पकडताना सातव्या मजल्यावरून खाली पडून तो ठार झाला. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील गुलराज टॉवरमध्ये राहणाऱ्या सागरला सकाळी साडेसहा वाजता घराच्या खिडकीच्या कोपऱ्यात कबुतरांचा थवा दिसला. त्यापैकी एकाला पकडण्यासाठी त्याने हात पुढे करताच त्याचा तोल गेला आणि थेट सातव्या मजल्यावरून तो खाली पडला. 
 
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.