रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (09:19 IST)

देशात नोटबंदी मग भाजपाकडे इतका पैसा आला कोठून - राज ठाकरे

देशात अचानक  नोटबंदी घोषणा  करताना आरबीआयला देखील  माहित नव्हते, ना केंद्रीय  मंत्रिमंडळाला माहीत होते. सर्व मंत्र्यांचे मोबाईल काढून घेतले गेले. सर्वोनुमते निर्णय का घेतला गेला नाही? 14 लाख कोटी रुपये देशाच्या व्यवहारात चलनात होते मात्र  500-800 कोटींच्या खोट्या नोटा असताना 14 लाख कोटी नोटाबंदी केली गेली होती. सन 2014 पासून आजपर्यंत  झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये मग भाजपाकडे पैसा आला कुठून? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.  राज ठाकरे यांनी इचलकरंजीमध्ये सभा घेतली त्यामध्ये ते बोलत होते. 

देशात  काळा पैसा परत  आणायचा असून, तर तुमच्या ईडी, आयकर विभाग यापासून सगळ्या गोष्टी तुमच्या हातात होत्या, काळा पैसा कुणाकडे आहे याची माहिती सरकारला नाही का? म नोटबंदीचा उद्देश स्वच्छ नव्हता असे दिसते. नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांचे रोजगार गेले, यंत्रमाग कामगार उधवस्त झाले असून, त्यानी आता नोकऱ्या कुठे शोधायच्या? नोटबंदी, जीएसटी याबाबत काहीही  बोलायला भाजपा  तयार होत नाही.  जाहिरातींवर साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले तर नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा खरच झाला की नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे. देशामधील पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला आहे. राज ठाकरे पूर्ण राज्यात लोकसभेच्या अनुषंगाने सभा घेत आहेत. राज पुढे म्हणाले की निवडणुकीत माझा  उमेदवार  उभे नाहीत,  तरी भाजपावाले फडफडतायेत, आम्ही सभा घेतोय तर खर्च आमच्यात खात्यात मोजणार असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.