शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (17:28 IST)

राज ठाकरे यांनी सरकारच्या दाव्याची चिरफाड

मनसे प्रमुख राज ठाकरे लोकसभेसाठी राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. असे करतांना ते सरकारच्या अनेक योजना कश्या खोट्या आहेत हे दाखवून देत आहे त्यामुळे भाजपची जोरदार अडचण झाली आहे. सोलापूर येथील सभेत भाजपाच्या तथाकथित डिजिटल गावाचं खरं रुप दाखवत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सरकारच्या दाव्याची चिरफाड केली. भाजपानं हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा दावा केला मात्र, तो धादांत खोटा आहे, असं म्हणत राज यांनी हरिसाल गावाची सद्यस्थिती व्हिडीओसह उपस्थितांना दाखवली होती. या प्रकारानंतर भाजपा सरकार जागे झाले असून हरिसाल गावातील जे तांत्रिक मुद्दे असतील, ते सोडवू असे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी सांगितले.  
 
भाजपानं अमरावतीमधल्या हरिसाल येथील गावाची जोरदार जाहिरात केली, यामध्ये हरिसाल गाव डिजिटल झाल्याचं चित्र दाखवले होते. या गावात इंटरनेट असल्याचं, दुकानांवर डिजिटल पेमेंट होत असल्याचं जाहिरातीत दाखवलं आहे. मात्र हरिसाल गावातली खरी परिस्थिती वेगळीच असल्याचं मनसेनं व्हिडियो आणि प्रत्यक्ष मुलाखतीतून दाखवले आहे. हरिसाल गावातल्या जाहिरातील हा तरून पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना भेटला आणि त्यानंतर तो माझ्या संपर्कात आला,' असं राज यांनी सांगितलं आहे. राज ठाकरेंच्या या पोलखोल सभेनंतर भाजपा नेते आणि मंत्री विनोद तावडेंनी सराकरतर्फे लगेच आश्वासन दिले असून, गावातील तांत्रिक मुद्दे सोडवले जाती, असे तावडे म्हणाले. त्यामुळे भाजपचे दावे खोटे आहेत का असा प्रश्न चर्चेत आला आहे.