मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (17:14 IST)

रेणुका शहाणे संतापल्या म्हणल्या आझम खान यांना तिकीट देऊ नका

भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जया प्रदा यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांच्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे संतापल्या आहेत. रेणुका शहाणे यांनी आझम खानच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध केला आहे. या अशा व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ नये अशी मागणी त्यांनी सोशल मिडिया साईट ट्विटरवरुन केली. 
 
अभिनेत्री जया प्रदा उत्तरप्रदेशच्या रामपूरमधून आझम खान यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. प्रचार सभेमध्ये आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. आझम खान यांनी जया प्रदा यांच्यावर कंबरेखालच्या भाषेत टीका केली. त्यांच्यावर त्यामुळे सर्वच स्तरावरुन जोरदार टीका होत असून, एफआयआर देखील दाखल केली आहे. सोबतच निवडणूक आयोगाने आझम खान यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल घेतली असून आजम खानला ७२ तासांची प्रचारबंदी केलीय. रेणुका शहाणे यांनी ट्विटरवरुन आझम खान यांच्याविरोधात टीका केली आहे. रेणुका शहाणे या नेहमीच सोशल मीडियावर आपली मते व्यक्त करत असतात.