चव्हाणांनी प्रचारासाठी नेताही भाडोत्री आणला : मुख्यमंत्री
अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी नेताही भाडोत्री आणला, भाडोत्री नेता आणून अशोक चव्हाण समर्थन मागत आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांची नांदेडमध्ये सभा पार पडली त्या सभेत मुख्यमंत्री आणि मोदींवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा डाव आखला आहे असाही आरोप केला.
राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करत आहेत. मात्र यासंदर्भातला करार अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला असं म्हणत या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. अशोकराव तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तु्म्ही नांदेडला किती पैसे दिलेत सांगा? आम्ही २ हजार २२६ कोटी थेट शेतकऱ्यांना दिले हे तुम्ही कसं विसरता? असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.