सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील यांची समोरासमोर भेट
रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बांडेवाडी या गावातील यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे आणि भाजपचे स्टार प्रचारक चंद्रकांत दादा पाटील यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना हसतमुखानं नमस्कार केला... आणि त्यानंतर दोघेही आपापल्या रस्त्यानं रवाना झाले.
यापूर्वी, सांगलीत भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची कन्या सुप्रिया सुळे या नक्कीच पराभूत होणार असं भाकीत वर्तवलं होतं. सुप्रिया हरणार असं चित्रं दिसत असल्यानंच पवार यांनी बारामती मतदार संघातील आपला प्रवास वाढवल्याचा दावाही त्यांनी केला होता.