शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (17:26 IST)

धनंजय मुंडे यांनी जाहीर सभा केली रद्द

बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गणेशपार या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा होती. मात्र, यासभेला धनंजय मुंडे आले आणि त्यांनी चक्क व्यासपीठावर येऊन ही सभा रद्द केल्याचे जाहीर केले. या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडेचे काही तासांपूर्वीच दुःखद निधन झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
 
वैजनाथ हा एक तरुण आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा माझा चांगला मित्र होता. पक्ष कोणताही असला तरी शहरातील सामाजिक चळवळ जिवंत राहण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असते. वैजनाथ आणि त्याचे कुटुंबीय दुःखात असताना मला सभा घेणे योग्य वाटत नाही, म्हणून आपण सर्वजण वैजनाथला श्रद्धांजली वाहूया असे सांगितले.