शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2023 (07:28 IST)

अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी

NCP has given a big responsibility to Amol Kolhe : 9 नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. काही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत, तर काही नेते खासदार शरद पवार यांच्यासोबत थांबले आहेत. या फुटीनंतर आता पक्षात मोठे बदल करण्यात येत आहेत.
 
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुखपद देण्यात आले आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
 
खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या मंत्रिपद शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते,पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा वाय बी चव्हान सेंटरमध्ये मेळावा झाला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हे यांनी पक्षाच्या प्रचार प्रमुखाची ऑफर दिली होती.
 
एनसीपीच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. 'पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.