बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 11 जुलै 2023 (19:32 IST)

Pune : मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर, सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकत्र येणार

sharad pawar modi
राज्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर राजकीय भूकंप आला आहे. पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर दिसू शकतात. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहे. आता या कार्यक्रमाला राष्ट्रवादीत पक्षात मोठी फूट पडल्यावर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र मंचावर दिसू शकतात. शरद पवार यांनी कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारले की नाही हे अद्याप समजू शकले नाही. 
 
1ऑगस्ट या लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण केलं जातं. या वर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या वितरण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Edited by - Priya Dixit