मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (10:48 IST)

शेतकऱ्यांवर नवीन संकट उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

सध्या शेतकरींवर नवीन संकटे उद्भवत आहे.गेल्या आठवड्यापासून उसाच्या शेतीवर पांढऱ्या माशांचा प्रादुर्भाव दिसत आहे.हे संकट आहे जळगावातील चोपडा तालुक्यात उसाच्या पिकांवर माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
त्या भागात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी लागली आहे.त्या वर आता एक नवीन संकट त्यांच्यापुढे उभारले आहे.
 
दर वर्षी जून महिन्यात पावसाळा असतो परंतु यंदाच्या वर्षी पाऊस नसल्याने शेतकरी बांधव काळजीत आहे.उसाच्या पीकेसाठी पाणी भरपूर लागते.परंतु पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांसाठी काळजीचे कारण आहे.त्यात आता नवे संकट म्हणून पांढऱ्या माशांचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे.
 
हवामान खात्यावर यंदा पाऊस चांगला होणार असे अंदाज वर्तविले होते.परंतु अद्याप पाऊस नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस आल्यामुळे माशाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.